Editorial – Oct 2019

नमस्कार मंडळी,

आशयघन च्या चौथा अंकात स्वागत.   

स्फूर्ती, हुरूप, प्रेरणा, ऊर्जा,बळ…
मनाला चालना मिळते म्हणजे नक्की काय होतं ?
सृजनशीलतेचं बीज उत्तेजीत करता येतं का ?
कला आणि कारागीरी ह्यातला फरक काय ?

यामिनी (खरे) ला खरेचं असे काहीतरी विषेश जाणवले असेल.
…असेल… पण ते नेमके काय ते कधी कधी शब्दात बांधता येत नाही. काही क्षणांची पूर्णता ही केवळ त्या कलाकृती समवेत बसून अनुभवायची असते…दर्शन मिलायला !
यामिनी ने तिचे चित्र पाठवले तेव्हा तिला वाटले आम्ही त्याचा stationery सारखा उपयोग करू. एखाद्या लेखाची border म्हणून.
जादूच्या पेटीचे – आदित्य ओक ह्यांनी आपल्या typical orchestra मधल्या दुय्यम स्थानाबद्दल ची हकीगत सांगितली तेव्हा पटलं की आवाजाला पेटीची जादू लाभल्या शिवाय गाणं सजणारं नसतं पण त्याचं महत्व प्रेक्षकांच्या मनांत आवाज वजा केल्याशिवाय होत नाही. 
म्हणून…हे चित्र…”as is” !

शुभदा ताई ( जोशी ) ह्या इतकी वर्षे आपल्यात राहून आपल्याला त्यांची कवयत्रि म्हणून ओळख नसेल. एवढचं नव्हे तर त्यांचा ‘घननीळ’ हा काव्यसंग्रह प्रकाशीत झाल्याचं गोड गुपीत उलघडलं. त्यांना विनंती केली आहे की त्यांच्या ह्या प्रवासाबद्दल थोडे लिहावे अथवा गप्पा माराव्यात. जमल्यास संग्रहाचे संकेतस्थळ आशयघन वर छापू.

सुधीर काकां (कुलकर्णी ) चे बरेच लेख प्रकाशीत झाले आहेत हे आपण जाणतोच.वेळोवेळी त्यांनी त्यांचा अनुभवांचा अहेर आपल्याला अगदी सहजपणे आवर्जून सोपवला. लिखाणाच्या विविध छटा त्यांनी अगदी प्रयत्नपूर्वक हाताळळ्या आहेत हे आज आम्हाला त्यांच्या ‘नाट्यछटा’ च्या रूपात आस्वाद घेताना कळले. दिवाकर नाट्यछटा हा साहीत्यिक शोध त्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना होईल अशी आशा आणि माहीत असलेल्यांना पुनःपरिचय …

“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उधोग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी  मैत्री जमवा. पोटापाण्याचा उधोग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल  – पु. ल.”

तर हा आपल्याच कुटुंबाकडुन आपल्या सर्वांना दिवाळसणाचा अगदी खास फराळ ! 
कलात्मक समृद्धीच्या आपणां सर्वांना शुभेच्छा!

 

Preeti and Rohi
AMM_Ashayghan Blog editors 2019-20