Tuch Hya Srushticha Aadi – Sarita Wagh

तूच या सृष्टीचा आदि
तुझ्यातच विलीन अनंत 
तूच विखुरलास अंश होऊनि 
धरणीवर या जीवात प्रत्येक
तूच माझे नित्य ध्येय 
तूच माझा आराध्य देव
तूच अंधारात प्रकाश होऊनि
वाट दाखविसी आम्हा नेहमी
तूच होऊनि शब्द येशी
विचारांमध्ये माझ्या मनी 
अश्रू होऊनि तूच वाहशी 
भक्तीने ओत-प्रोत या नेत्री
मंत्र होऊनि गुरूंच्या मुखी
तूच आलास माझ्या हृदयी
वास असुदे नित्य असाच
कठीण अशा या जीवनात 
धैर्य न विश्वास होवो कमी
हीच प्रार्थना प्रतिदिनी
तुझेच रूप असो ध्यानी
जेंव्हा क्षण अंतिम येई
 

सरिता वाघ

For any comments Sarita can be reached at Saritawagh@gmail.com