संत वांग्मय

संत वांग्मय हा महाराष्ट्राचा मोठा वारसा. दासबोध वाचून बरीच वर्ष झाली होती. पुन: वाचायला सुरवात करताना एक विचार मनांत आला. नारायण, (रामदास ) याची वधू काशी बोहल्यावर उभी डोळ्यासमोर राहिली.केवळ ९ वर्षांची मुलगी, मुंडावळ्या बांधिलेली, मोठ कूंकू, दागिन्याने मढलेली, नऊ वारी पातळ सावरत, हातात हार घेतलेली. मध्ये अंतर्पाठ. पलिकडे नारायण. तोही लहानच १२ वर्षांचा. आईला दिलेल वचन पाळण्याकरिता , या विश्वाचा विचार मनांत ठसलेला, नाइलाजाने बोहल्यावर उभा. यातून कस बाहेर पडायच याचा विचार करत असेल का? मामेभाऊ तिचा नवरा होणारं होता. त्यांच नवीन आयुष्य सुरु होणारं होत. पण घडल सगळ अघटितच. मंगलाष्टक सुरू झाली आणि “सावधान” हा शब्द कानावर पडला नारायणाच्या. त्याने धूम ठोकली. मंडपात कल्लोळ माजला. नवरा मुलगा पळाला. सगळे पुरुष त्याच्या मागे धावत सुटले. नारायणाचा भाऊ पण त्यात अग्रभागी होता. पण नारायण कांही हाती लागला नाही. परतला तो रामदास म्हणूनच! कित्येक वर्षानी साधनां पूर्ण करूनच.मंडपात त्या लहान वधूला काय वाटले असेल? ती इतकी लहान होती की सगळी परिस्थिती तिच्या लक्षात ती आली असेल का? का नारायण धूम पळाला म्हणून गमतीच वाटले असेल? नारायण सापडेना तेव्हा त्याचा मोठा भाऊ गंगाधर याने नवीन वर शोधला. ब्राम्हण वर तयार होईना. एक तरूण मराठा तिच्या बरोबर विवाह करायला तयार झाला. आणि ते लग्न लागल. वधू काशीच्या वडिलांनी खूप प्रायासानी विवाहाला परवानगी दिली.१७ व शतक, मराठा तरूण नवीन वर, मंडपातून पळून गेलेला वर, एक लहान ब्राम्हण वधू, कन्यादान केलं नारायणाचा भाऊ गंगाधर याने. हा पहिला आंतरजातीय विवाह हाता. मराठा आणि ब्राम्हण यांचा. पण रूढींचा पगडा जबरदस्त असतो. काशीच शव एका जवळच्याच विहिरीत सापडल. थोड्यात आठवड्यात लग्नानंतर. तिने जीव दिला का तिला विहिरीत कुणी ढकलल ते तो काळच जाणे. तो काळ, मराठा ब्राम्हण विवाह, आजूबाजूच्या लोकांना जाच, घरात कूचंबणा!कुणास ठाऊक कंस हे घडल?अनेक कारण एकत्र येतात. घटना घडतात. १२ वर्षाच्या नारायणाचा मार्ग ठरलेलाच होता. तो तर जगाला मार्ग दाखवण्याकरिताच जन्मला होता.. आईला लग्नाच वचन दिल होत. हे सर्वच रूढींचे बळी होते. तत्कालीन परिस्थिती रुढींच्या बंधनात जखडलेली. पण या घटनेत पण रुढीला टक्कर देणारे होतेच. नारायणाचो बंधू गंगाधरपंतानी वर शोधला तो मराठा म्हणून ब्राम्हण कुटंबातून संपूर्ण विरोध. काशीचे वडील तयार झाले मुष्कीलेने. गंगाधरपंत, काशीचे वडील, मराठा वर साखाजी मिंधर अंबड गावात सोमवाडीचा देशमुख. या तिघांनी समाजाच्या तीव्र विरोधाशी सामना दिला. रामदास आणि त्यांचे अप्रतीम दासबोधासारखे ग्रंथ, शिवाजीमहाराजांना गुरु या नात्याने दिलेला सक्रीय पाठिंबा हे तर सगळ महाराष्ट्रात प्रसीद्ध आहेच. रामदासांच नाव माहिती नसलेला महाराष्ट्रात तर विरळाच! बळी पडली ती अल्पवयीन काशी. जालना येथे अंबड गावात तिने जीव दिला का तिची हत्या झाली ते सांगायलाच आता कोणी नाही. पण ती बारव अजून सती काशीची बारव म्हणून ओळखली जाते. या घटनेत खलनायक नाही. येथे धैर्य आहे. संयम आहे. रुढीशी झगडा तर आहेच.रामदास पण आहेत. काशी, एक कोवळी निष्पाप पोर समाजाच्या अंध रुढीचा बळी ठरली. या सगळ्या रामदासी पंथात काशीच अस्तित्व आहेच. ही तिची आठवण आणि आपल्या मनांत अशा अंधश्रद्धा किती दडल्या आहेत हे पहाण्याची एक संधी! 

सुमन जोशी, अल्बनी न्यूयार्क 

Suman Joshi can be reached at sumanalpine@yahoo.com