​​Vidamban Kavya

अमेरिकेत राहणाऱ्या अनेक कुटुंबात नवराबायको आपापल्या कार्यक्षेत्रात मग्न असतात. ऑफिस अधून थकून आलेली बायको जेंव्हा वसकन ओरडते ‘दिवा बंद करा तो, आणि झोपा आता’, तेव्हा मनात प्रश्न पडतो, कुठे गेली ती सुरेश भटांची प्रेयसी, जी प्रियकराला म्हणते ‘मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग, राजसा किती दिसात लाभला निवांत संग’. अमेरीकेतील कुटुंबात होणाऱ्या ह्या कुतरओढीचे चित्र डोळ्यापुढे उभे राहिले आणि खालील विडंबन साकार झाले.

(सुरेश भटांची क्षमा मागून)

मालवून टाक दीप ठेचले रे अंग अंग 
राजसा किती दिसांत  लाभली निवांत झोप !

त्या तिथे बेडरुमात, पेंगतोय आपला बाळ
जावूनी तू त्या खोलीत डायपराची बदल कर !

डीश वाशेरीच्या आत, ठेवूनी ती भांडी सात 
मोकळे करून टाक एकवार किचन सिंक !

सर्व दूर कीचनात पसरली दुर्गंधी घाण
सावकाश घे लिपून एकवार फरशी छान !

हे तुला आता कळेल ? एकटी मी किती करेल ?
सांग, का कधी खरेच एकटा उडे पतंग ?

काय हा तुझाच श्वास ? घोरतोय तू अजून !
घोर रे हळू उठेल पाळण्यातला श्रीरंग !

विडंबन कवी : प्रवीण कारंजकर
p_karanjkar@yahoo.com