Editorial – June 2019 Edition


 ॥  ॐ श्री सरस्वत्यै नम:  ॥

नमस्कर मंडळी,

AMM आशयघन ब्लोग चा दुसरा अंक आज प्रकाशीत करत आहोत.


संपादनाचं काम हातात घेतलं तेव्हा सदस्यांनी विचारपुर्वक निवडलेल्या विषयांची इतकी उत्सुकता आम्हालाच लागून राहील इतकं वाटलं नव्हतं. त्यांचे विचार वा संकलीत लेख वाचत असताना आम्ही साहीत्यीक रित्या समृद्ध होऊ वा संदर्भा पलीकडच्या सामान्य ज्ञानाने डोळे उघडतील, ह्याचा अपेक्षे पलीकडला आनंद होत आहे.
ह्या अंकात डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि मेजर राम राघोबा राणे ह्या वीरांच्या आदरणीय, सन्माननीय आणि अत्यंत गर्वपूर्ण प्रेरणादायी आयुष्यांचा वैयक्तिक आढावा वाचा, अमोल जोगे आणि निखिल कोरतकर ह्यांच्या शब्ध शैलीत.
इतिहास शब्दांत संकुचीत करणं कठीण आहे. तसंच वर्षांनुवर्षे रसिक श्रोत्यांच्या मनात घर करून बसलेल्या काव्याचं विडंबन करणं म्हणजे खरं तर संकट. पण सर्व साधारण माणसांचे सामान्य प्रश्न त्या चालीचा आधार घेऊ पाहात असतील तर ? प्रवीण कारंजकरांनी प्रयत्न केला आहे.
सुधीर काकांनी ( कुलकर्णी ) एका छात्रालया च्या भेटी चा अनुभव आपल्या साठी दर्शविला आहे. AIMforSEVA च्या Albany Chapter नी हे छात्रालय प्रायोजीत केलेले आहे. लेखात काकांनी एक सुंदर शब्द प्रयोग केला आहे – “भारतवारी” … दुसऱ्या कोणता – visit, vacation, trip आदी शब्द आपल्या जन्मभूमिशी ‘वारी’ सारखं नातं जोडू शकत नाही असं मला वाटतं. ज्या मातीत रुजून आपल्या बीजाचं आज वृ्क्ष पसरलं आहे त्याच मातीत आपला एक अंश सांडून येणे म्हणजे परिपुर्णतेचा वाटेवरचा एक छोटासा अनुभव.

आपल्या ऑल्बनी कुटुंबाच्या ह्या प्रयत्नांना तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे. तसेच तुम्हाला जिव्हाळ्याचं हितगुज करण्यासाठी हा अगदी अनौपचारीक कट्टा. पुढील अंकासाठी आम्ही वाट पाहतोय…तुमच्या लेखाची !     
नम्र,

प्रीति आणि रोहित